नमस्कार श्रोतेहो,
तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
मनातील सर्व राग-रुसवे , हेवेदावे विसरून आनंदाने हिंदू नववर्षाची सुरुवात पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने करावी असे सांगणारा हा होळीचा सण .. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा.. होळी पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमा. जागोजागी संध्याकाळी पेटवलेल्या होळ्या, नैवेद्याला खुसखुशीत पुरणपोळी ही ह्या सणाची खासियत. त्याचबरोबर होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारे धुलीवंदन आणि पंचमीला येते ती रंगपंचमी ... वसंत ऋतूत येणारा, रंगांची उधळण करणारा हा सण लहान-थोर साऱ्यांच्याच आवडीचा...या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या पॉडकास्ट मधून. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतात कसा साजरा केला जातो याबद्दलही ऐकूया.
सादरकर्त्या ... अपर्णा, सरोज आणि वैद्या स्वाती...
मग नक्की ऐका...
संकल्पना व सहभाग -
सौ.अपर्णा मोडक
वैद्या स्वाती कर्वे
सौ.सरोज करमरकर