भारतामध्ये 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन - एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा होतो. देशभरात सर्वत्र ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हटले जाते. ज्या हजारो देशभक्तांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते , त्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मान केला जातो.
या दिवशी ,भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.
ह्या संचलनाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्याची माहिती या पॉडकास्ट मधून आपणास मिळेल.
बीटिंग द रिट्रीट या कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता केली जाते .
'जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है' ह्या आजच्या पाॅडकास्टच्या माध्यमातून, आपल्या देशातील शहिदांना मानवंदना देऊया.
याचबरोबर माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंती आणि महाशिवरात्र ह्या उत्सवांबद्दलही थोडी माहिती जाणून घेऊया.
संकल्पना व सहभाग -
वैद्या स्वाती कर्वे,
सौ.अपर्णा मोडक,
सौ.सरोज करमरकर