Punavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi PodcastPunavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi Podcast

पगडी, पागोटे व जिरेटोप

View descriptionShare

पगडी, पागोटे व जिरेटोप


जगातील पुरूषांकडून डोके झाकण्यासाठी विविध साधनांचा/वस्तुंचा वापर पूर्वपरंपार आहे. त्यांची नांवेही वेगवेगळी आढळतात .पगडी,पागोटे,फेटा अशी त्यातली कांही नांवे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, पारसी व अन्य अनेक धर्मात शुभ प्रसंगी डोके झाकणे अनिवार्य असते. स्त्रीया देखील डोक्यावर पदर, घुंगट घेतांना तसेच हॅट्स व विविध प्रकारच्या टोप्या/वस्तू वापरतांना आढळतांना दिसतात. सैन्य व पोलिस दलात तर टोप्या गणवेषाचा अविभाज्य भाग असतो. समारे ७०-८० वर्षापूर्वी पागोटे घालण्याच्या प्रकारानुसार व्यक्ती कोणत्या समाजाचा आहे ते कळायचे. वारक-यांची ओळख तर त्यांच्या टोपीमुळेच होते. स्वातंत्र्य लढ्यात तर गांधी टोपीचे योगदान फार मोठे. संघाची काळी टोपी, सावरकरांची गोल उभी काळी टोपी,आर.पी.आय.ची निळी टोपी आणि किसान आंदोलनाची हिरवी टोपी यामुळे डोक्यामधील विचारधारा डोक्यावरच्या टोपीमुळे सहज लक्षात येते. लग्न समारंभात आता फेटा बांधणे अगत्याचे झाले आहे. पगडी, पागोटे यांचा संबंध प्रतिष्ठा व आत्मसन्मानशीही जोडला जातो. पागोटे दुसर्‍या व्यक्तीच्या पायावर ठेवणे म्हणजे आत्मसन्मान त्या व्यक्तीच्या चरणी ठेवणे असे समजले जाते. पगडी उछालना या हिंदी म्हणीचा अर्थ आत्मसन्मानाचा भंग करणे असा होतो. कुणाच्या मृत्यूची बातमी कळताच डोक्यावरची टोपी काढून मृत व्यक्तीच्याप्रती सन्मान प्रगट केल्या जातो. युध्दात डोक्याला ईजा होऊ म्हणून शिरस्त्राण वापरले जाते. तर स्वयंचलित दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर सक्तीचा आहे. राजस्थानी, गुजराथी व अन्य राज्यातील पगड्या त्या त्या राज्याचे वैशिष्ट्य असतात. राजे, प्रधान मंत्री, मंत्री, सेनापती यांच्या पगड्या त्यांच्या मानाप्रमाणे असत. प्रत्येक राजाची पगडी विशेष असायची. पुण्यप्रतापी छ. शिवाजी महाराज व हिंदूह्रदयसम्राट छ. संभाजी महाराज हे जिरेटोप घालत. हे दोन्ही राजे हिंदुधर्म भूषण. सभोती संकटे वाढून ठेवलेली. गनिम केंव्हा घाला घालतील याचा नेम नाही. अष्टौप्रहर जागृत असणे व युध्दसज्ज असणे गरजेचे. त्यामुळे शिर संरक्षित असणेही महत्वाचे. पण कसे, तर इतरांच्या लक्षात येऊ न देता. यामुळे त्यांचा मुकूटही विशेष प्रकारचा. त्याचे सुप्रसिध्द नांव जिरेटोप. जिरे हा शब्द मुळचा झिरीह असा असून तो फारसी आहे. त्याचा अर्थ साखळीचे चिलखत असा होतो. या मुकूटाच्या अंतर्भागात बारिक नक्षीदार लोख॔डी कड्या जरीच्या धाग्यांनी मढवलेल्या असतात. अर्थात इतर राजे परिधान करत असलेल्या मुकूटापेक्षा हा मुकूट थोडा जड असतो. तर असा असतो जिरेटोप. या जिरे चा सैंपाकातील जिरे शी काहीही संबंध नाही, बरे का.    

 

किरण देशपांडे

२७-०८-२०२१

  • Facebook
  • X (Twitter)
  • WhatsApp
  • Email

In 2 playlist(s)

  1. Punavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi Podcast

    12 clip(s)

  2. Latest on Bingepods

    25,638 clip(s)

Punavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi Podcast

मराठी भाषचं भविष्य वैगरे अश्या मोठं मोठ्या विषयांवर आपण भाष्य करणार नाही आहे, पण रोजच्या बोली भाषेत  
Social links
Follow podcast
Recent clips
Browse 12 clip(s)